Famous places in India | भारतातील प्रसिद्ध ठिकाण

India famous places

Famous places in India | भारतातील प्रसिद्ध ठिकाण भारतासारख्या खंडप्राय देशाचे अनेक बाबतीत वैशिष्ट्य दिसून येते. इथे हेमावृष्टीची ठिकाण ही आहेत आणि तीन बाजूने वेढलेला समुद्र व सुंदर किनारी ही आहेत, इथे वाळवंटही आहे आणि सर्वाधिक पाऊस पडण्याची ठिकाणेही आहेत. निसर्गाचे सर्व रंग आपल्या देशात पाहायला मिळतात देशातील काही ठिकाणांनी जागतिक विक्रम ही नोंदवलेले आहेत … Read more

Kunbi Caste Certificate Genealogy| कुणबी जात प्रमाणपत्र वंशावळी

kunbi

Kunbi Caste Certificate Genealogy| कुणबी जात प्रमाणपत्र वंशावळीपश्चिम भारतातील पारंपारिक शेतकऱ्यांच्या अनेक जातींना कुणबी (पर्याय्याने काणबी) हा एक सामान्य शब्द लागू होतो. हा समुदाय जास्तीत जास्त महाराष्ट्रात आढळतो. मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक, केरळ व गोवा राज्यात देखील हा समुदाय आढळतो. महाराष्ट्रातील इतर मागासवर्गीयांमध्ये (ओबीसी) कुणबींचा समावेश होतो. 19व्या शतकापूर्वी मराठा-कुणबी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रीयन कृषी जातींच्या मोठ्या गटाबद्दल फारच कमी माहिती नोंदवण्यात आली आहे.

दही कसं तयार होतं? | How is curd prepared?

दही कसं तयार होतं? | How is curd prepared?

दही कसं तयार होतं? | How is curd prepared?
कोणत्याही गृहिणीला विचारा. ती म्हणेल, ‘इश्श! त्यात काय आहे? दुधात इवलंसं विरजण घाला आणि झाकून ठेवा, रात्री झोपण्यापूर्वी ठेवलंत तर सकाळी उठाल तेव्हा दही तयार झालेलं असेल. खरं आहे. पण मग दिल्लीसारख्या उत्तरेकडच्या शहरात हिवाळ्यात तसं करुनही दही का लागत नाही? आणि विरजण म्हणजे तरी काय? ते दुधात टाकल्यावर नेमकं काय काय होतं, की त्यापासून दही तयार व्हावं? हे प्रश्न तसेच लोंबकळत राहतात. त्यांची उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न करायलाच हवा ना!

फिंगर प्रिंट्स म्हणजे काय ? | What are finger prints?

Biggest railway station

फिंगर प्रिंट्स म्हणजे काय ? | What are finger prints?
अनेक वेळा तुम्ही फिंगर प्रिंटबद्दल ऐकले असेल. एखाद्या हिंदी चित्रपटात खून करून पळालेल्या वा खून केल्याचा संशय असलेल्या व्यक्तीच्या हाताच्या बोटांचे ठसे बुद्धिमान पोलिस इन्स्पेक्टर कोणत्या तरी निमित्ताने (जसे त्याचा पाणी प्यायलेला ग्लास मिळवून वगैरे!) घेतानाही तुम्ही पाहिले असेल. त्याच्या हुशारीला दादही दिली असेल. हाताच्या बोटांच्या ठशांचा खरेच काही उपयोग होतो का, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. आधी हे लक्षात घेऊ की, बोटांच्या शेवटच्या पेरावर असलेल्या उंचवटे व खोलगट भागांवर हे फिंगर प्रिंट अवलंबून असतात. तुमची बोटे स्वच्छ धुवा. नंतर एखादे भिंग घेऊन त्याखाली बोटे बघा. तुम्हाला असे दिसेल की, वोटांवर चित्रात दाखवल्याप्रमाणे आकार दिसतील.