Famous places in India | भारतातील प्रसिद्ध ठिकाण

Famous places in India | भारतातील प्रसिद्ध ठिकाण

भारतासारख्या खंडप्राय देशाचे अनेक बाबतीत वैशिष्ट्य दिसून येते. इथे हेमावृष्टीची ठिकाण ही आहेत आणि तीन बाजूने वेढलेला समुद्र व सुंदर किनारी ही आहेत, इथे वाळवंटही आहे आणि सर्वाधिक पाऊस पडण्याची ठिकाणेही आहेत. निसर्गाचे सर्व रंग आपल्या देशात पाहायला मिळतात देशातील काही ठिकाणांनी जागतिक विक्रम ही नोंदवलेले आहेत अशाच पाच ठिकाणांची ही माहिती….

तरंगते गाव

ईशान्य भारतातील मणिपूर राज्यात दक्षिण आशियातील गोड्या पाण्याचे सर्वात मोठे सरोवर आहे. या सरोवराचे नाव आहे लोक तक हे सरोवर त्यामध्ये प्रसिद्ध आहे ही पाण्यावर तरंगत असलेली माती जैविक घटक आणि अन्य घटकांपासून बनलेली वर्तुळाकार छोटी भेटच आहेत याच सरोवर चंपू खांगपोक नावाचे तरंगते गाव आहे हे गाव पाहण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात.

सर्वाधिक उंचीवरील पोस्ट ऑफिस

जगातील सर्वाधिक उंच ठिकाणी असलेले पोस्ट ऑफिसही भारतातच आहे हिमाचल प्रदेशच्या लाहोल स्पिती जिल्ह्यातील हिक्कीम येथे हे पोस्ट ऑफिस आहे ते समुद्रसपाटीपासून 14567 फूट उंचीवर आहे 1983 मध्ये हे पोस्ट ऑफिस सुरू झाले.

सर्वाधिक उंचीवरील रस्ता

जगातील सर्वाधिक उंच ठिकाणी असलेला रस्ता भारतातच आहे लडाख मधील उमलिंग ला हा रस्ता समुद्रसपाटीपासून 19 हजार 24 फूट उंचीवर आहे हा 52 किलोमीटरचा रस्ता असून तो चिशुम्ले ते देमचोक यांना जोडतो आता त्याच्यापेक्षा अधिक उंचीवरील रस्ता लडाख मध्येच बनत आहे हा मोटो रेबल रोड मिग ला येथे तब्बल 19400 फूट उंचीवर आहे.

सर्वात उंच रेल्वे पूल

भारतात च जगातील सर्वात उंच रेल्वे पूल आहे जम्मू-काश्मीरच्या जम्मू विभागातील राशी जिल्ह्यात बक्कल आणि गौरी यांना जोडणारा हा कमानीच्या आकारातील पूल आहे चिनाब नदीवरील हा पूल नदीपासून 359 मीटर म्हणजेच 1178 फूट उंचीवर आहे आणि फेर टॉवर पेक्षाही उंच असणाऱ्या या पुलाखाली ढग दिसतात

सर्वात पहिला सूर्योदय

ईशान्य भारतातील अरुणाचल प्रदेश राज्याच्या नावातच अरुण म्हणजे सूर्याचा सारथी आहे देशात सर्वात आधी याच राज्यात सूर्योदय होतो सूर्योदयाचे सुंदर दृश्य पाहण्यासाठी अनेक पर्यटक या राज्यातील डोंग व्हॅलीमध्ये येतात याच भूमि देशातील पहिला सूर्योदय दिसतो हे अत्यंत निसर्गरम्य असे ठिकाण आहे.

Leave a Comment