दही कसं तयार होतं? | How is curd prepared?दही कसं तयार होतं? | How is curd prepared?

दही कसं तयार होतं? | How is curd prepared?

दूध आपल्या आहारातील मुख्य हिस्सा आहेच तसेच तो खूप स्वादिष्ट आणि आपल्या आरोग्यासाठी अतिशय लाभदायक आहे. कॅल्शियम चे प्रमाण दुधामध्ये अतिशय जास्त असतं त्यामुळे आपल्या शरीरातील हाडे आणि मांसपेशी यांची वाढ व स्वस्त होण्यास मजबूत होण्यास मदत होते. याच्यामध्ये खनिज असतात, तसेच महत्त्वाचे पोषक तत्वे देखील आढळतात. दूध प्याल्यामुळे वजन कमी कमी होणे, तसेच अनेक लाभ होतात. त्यामुळे दररोज आपल्याला दूध पिणे गरजेचे असते. दुधाचे अनेक बरेचसे फायदे आहेत ते आपण याच्या मध्ये पाहणार आहोत. दुधापासून आपल्याला कॅल्शियम हायड्रेशन विटामिन डी तणाव कमी करणे विटामिन ची मात्रांमध्ये वाढ होणे वजन कमी होणे स्वस्त हाडे प्रति स्वस्त दात इत्यादी फायदे होतात

कोणत्याही गृहिणीला विचारा. ती म्हणेल, ‘इश्श! त्यात काय आहे? दुधात इवलंसं विरजण घाला आणि झाकून ठेवा, रात्री झोपण्यापूर्वी ठेवलंत तर सकाळी उठाल तेव्हा दही तयार झालेलं असेल. खरं आहे. पण मग दिल्लीसारख्या उत्तरेकडच्या शहरात हिवाळ्यात तसं करुनही दही का लागत नाही? आणि विरजण म्हणजे तरी काय? ते दुधात टाकल्यावर नेमकं काय काय होतं, की त्यापासून दही तयार व्हावं? हे प्रश्न तसेच लोंबकळत राहतात. त्यांची उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न करायलाच हवा ना!

तर, दुधामध्ये जी लॅक्टोज साखर असते तिचं विरजणापोटी आंबून लॅक्टिक आम्लात रूपांतर होतं. या आंबवण्याच्या प्रक्रियेला वैज्ञानिक भाषेत किण्वन म्हणतात. ती विक्रिया घडून येण्यासाठी जिवाणूंची आवश्यकता असते. लॅक्टोबॅसिलस जातीचे विषाणू ही कामगिरी पार पाडतात. जेव्हा जुन्या दह्यातून विरजण घेतलं जातं तेव्हा खरं तर त्यातून या जिवाणूंचा नमुनाच उचलला जातो. जुन्या दह्यात त्याला आपल्या कामगिरीसाठी आवश्यक असलेली सामग्री मिळत नाही. कारण त्याच्याच करामतीपायी ती संपलेली असते. त्यामुळे ते जिवाणू तिथं तगून राहिलेले असले तरी त्यांची वाढ होत नाही; पण नव्या दुधात त्यांना सोडलं की तिथं त्यांना लॅक्टोज साखरेचा भरपूर साठा मिळतो आणि मग त्याच्यावर ताव मारत त्यांची वाढ होते व त्या साखरेचं लॉक्टिक आम्लात रूपांतर करण्याची कामगिरी त्यांच्याकडून सहजगत्या पार पाडली जाते.

अर्थात, त्यांची वाढ होण्यासाठी किंवा त्यांच्याकडून होणारी किण्वनाची कामगिरी पार पडण्यासाठी केवळ पोषक सामग्रीचा यथास्थित साठा असून भागत नाही. योग्य त्या तापमानाचीही आवश्यकता असते. सामान्यतः उष्ण दमट हवेत या दोन्ही विक्रिया व्यवस्थिरत पार पडतात. म्हणूनच थंडी असली की त्यांची वाढही नीट होत नाही, की किण्वनाची प्रक्रिया व्यवस्थित पार पडत नाही. साहजिकच दही नीट लागत नाही, कारण हव्या त्या प्रमाणात लॅक्टिक आम्लाची निर्मिती होत नाही. एकदा ते तयार झालं, की दुधातल्या प्रथिनांच्या गुंतागुंतीच्या साखळ्या उलगडण्याच्या कामाला लागतं. जोवर प्रथिनांच्या या साखळ्यांची मूळ रचना तशीच टिकून असते, तोवर त्या प्रथिनांचे रेणू एकमेकांपासून सुटे राहून त्या दुधात तरंगत असतात; पण त्या आम्लाच्या प्रभावापोटी त्या साखळ्या उलगडल्या गेल्या, की ते लांबलचक धागे एकमेकांमध्ये गुंतून त्यांची गुठळी व्हायला सुरुवात होते.

यालाच दही लागणं किंवा कर्ड लिंग असं म्हणतात. जेवढा या किण्वन या प्रक्रियेचा प्रभाव जास्त तेवढा दह्याचा आंबटपणाही वाढतो. म्हणूनच गोड दही लावायचं असेल तर विरजणाचं प्रमाण आणि म्हणूनच किण्वन प्रक्रिया या दोन्हींनाही नियंत्रणाखाली ठेवावं लागतं.

दही dahi che fayde | Benefits of curd | दह्याचे फायदे

 • जी लोक दररोज दही खातात त्यांच्या तोंडातून दुर्गंधी येत असेल तर ती येत नाही. तसेच त्यांचे दातांना कीड देखील लागत नाही.
 • दही खाल्ल्यामुळे आपली पाचनशक्ती वाढते.
 • दररोज आपण दही खाल्ल्यामुळे भूक न लागणे चा आजार कमी/ नाहीसा होतो.
 • दररोज दही खाण्यामुळे आपण स्ट्रॉंग होतो तसेच शरीरातील रोगप्रतिकार क्षमता वाढते.
 • जी लोक दररोज दह्याचे सेवन करतात त्यांची शुगर लेवल कंट्रोलमध्ये राहते.
 • नियमित दही खाल्ल्यामुळे पोटातील संबंधित आजार होत नाहीत.
 • दह्यामध्ये कॅल्शियम अधिक असल्या मुळे आपल्या शरीरातील हाडे देखील विकसित होतात.
 • दह्यामध्ये किसमिस, बादाम जर मिसळून खाल्लं तर जी माणसं शरीराने सडपातळ आहेत त्यांच्यामध्ये वजन वाढण्यास मदत होते.
 • दह्याबरोबर मध मिळवून खाल्ल्यास लहान मुलांमध्ये दात येण्याचा प्रॉब्लेम निघून जातो.
 • ज्यांना रात्रीची झोप येत नाही त्याच्यासाठी दही खाणे हे अत्यंत फायद्याचे आहे.
 • आपल्या डोक्यासाठी दह्याचे सेवन हे अतिशय फायद्याचे आहे कारण त्याच्यामध्ये विटामिन बी 12 जास्त मात्रा मध्ये असतात.
 • अँटिबायोटिक औषधांचे सेवन केल्यामुळे त्याचा जो दुष्परिणाम आहे त्याच्यातून वाचण्यासाठी दही खाण्याचे सल्ला डॉक्टर देत असतात.
 • दही खाण्याचा संबंध मस्तिष्का बरोबर आहे. आपल्याला असं जाणून आश्चर्य होईल की दही खाणाऱ्यांना तणावाची शिकायत कधीच होत नाही.
 • जर तुम्ही स्वतःला थकलं आहोत असं वाटत असेल तर तुम्ही दररोज दह्याचे सेवन केलं पाहिजे.
दही कसं तयार होतं? | How is curd prepared?

Famous Places in India | भारतातील प्रसिध्द ठिकाणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *