ई-पीक पाहणी कशी करावी? | How to do E pik Pahani?

ई-पीक पाहणी कशी करावी? | How to do E pik Pahani?

भारत सरकारने ठरवल्या पद्धतीने प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या पीकांची ई-पीक पाहणी करणे गरजेचे आहे.
ई-पिक पाहणी केली नाही तर पीएम किसान योजना किंवा त्याची मिळत असलेली रक्कम आपल्या खात्यात जमा होणार नाही. अशी अनेक बंधने सरकारने लाधली आहेत. त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी आपली ई-पीक पाहणी ही वेळेत करून घेणे गरजेचे आहे. आता आपण हे पाहूया की ई-पिक पाहणी कशी करावी? त्यासाठी आपल्याला सुरुवातीला ई-पिक पाहणी ही ॲप प्ले स्टोअर वरती उपलब्ध आहे. तेथुन ई-पीक पाहणी ॲप डाऊनलोड करून ती मोबाईल वरती इन्स्टॉल करून घेण्यात यावी.
ई-पीक पाहणी ॲप वरुन नोंद कशी करावी याची माहिती शेतकर्यांना असणे गरजेचे आहे.

ई-पीक पाहणी

ई-पीक पाहणी कशी करावी?

Maharashtra Government :

आपली नोंदणी खालील क्रमांकावर करण्यात येत आहे अशी सूचना तिथे मिळाल्यानंतर, जर तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक बदलायचा असल्यास मोबाईल क्रमांक बदला हे बटन दाबा. मोबाईल नंबर टाका आणि मग पुढे जा..

आता तुम्ही गेल्या वर्षी या ॲपवर नोंदणी केले असेल तर तुमची नोंदणी आधीच झाली आहे तुम्हाला पुढे जायचे का असा मेसेज तिथे येईल पण तुम्ही यावर्षी पहिल्यांदाच नोंद करणारा असाल तर असा तसा मेसेज येणार नाही.

त्यानंतर हो बटन पर्यायावर क्लिक करा.

खातेदाराचे नाव निवडा,

सांकेतांक विसरलात यावर क्लिक करा व संकेत संकेतांक क्रमांक टाका.

आता पीक पाहणीच्या ॲपवर तुम्ही तुमच्या पिकांची नोंद करू शकता. इथं पीक माहिती नोंदवा या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

त्यानंतर खाते क्रमांक, गट क्रमांक निवडवा व लागवडीखालील जमिनीचे एकूण क्षेत्र आणि पोट खराब क्षेत्र तिथे आपोआप येईल.

पुढे खरीप हंगाम निवडावा. पिकाचा वर्ग जसे की निर्भय पिक आहे की मिश्र पीक किंवा इतर ते निवडायचे आहे.

एकदा ही माहिती भरून झाली की पुढे जलसिंचनाचे साधन जसे की विहीर तलाव किंवा नदी हे सांगायचे आहे.

त्यानंतर सिंचन पद्धत आणि लागवडीची तारीख निवडायची आहे.

पुढे अक्षांश रेखांश मिळवा या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

त्यानंतर शेवटला फोटो काढा वर क्लिक करून पिकाचा फोटो अपलोड करायचा आहे. हा फोटो घेत असताना तुम्ही तुमच्या शेतामध्ये उभा राहून घ्यायचा आहे.

त्यानंतर तुम्ही जी माहिती भरली आहे ती तुम्हाला स्वयंघोषनेवर क्लिक करून पाहायचे आहे, त्यानंतर तुम्हाला पिक माहिती साठवली आणि अपलोड झाली आहे अशी सूचना येईल.

ठीक आहे म्हणायचं आहे.

नोंदवलेल्या पिकाची माहिती पाहण्यासाठी पिकांची माहिती पहा या पर्यायावर क्लिक करून तुम्ही भरलेली माहिती पाहू शकता.

Maharashtra Government शेतातील पिकांची नोंद शेतकरी स्वतःहून करू शकणार आहेत. अशा प्रकारे दुसऱ्या एखाद्या गटातल्या पिकांची नोंद करायची असेल तर आता सांगितलेल्या प्रक्रियेप्रमाणे तुम्ही करून घ्यावी.

सगळ्यात शेवटी अपलोड या पर्यायावर क्लिक करून माहिती अपलोड करायची आहे.

ई-पीक पाहणी कशी करावी? | How to do E pik Pahani?
ई-पीक पाहणी कशी करावी? | How to do E pik Pahani?

ई-पीक पाहणी – E Pik Pahani

आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. येथील अर्थव्यवस्था ही बऱ्यापैकी शेतीवरती अवलंबून आहे.
त्यामानाने शेती किंवा शेतीकऱ्यांसाठी हव्या असलेल्या सोयी सुविधा फारच कमी आहेत. अलीकडच्या काळामध्ये
माहिती तंत्रज्ञानाचा वापर होत वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी देखील काही महत्त्वाच्या गोष्टींकरीता कम्प्युटर चा वापर आत्ता होत आहे. आतापर्यंतच्या कालखंडामध्ये जी पीक पाहणी केली जायची ती तलाठी जागेवरती येऊन किंवा
ऑफिसमध्ये सांगितले प्रमाणे किंवा मिळाले माहितीप्रमाणे पीक पाहणी नोंदवून त्याचे काम पूर्ण करत असे.
त्यामुळे खरोखरच त्या शेतामध्ये ते पीक घेतले जात आहे किंवा नाही याची पूर्ण शाश्वती मिळत नसे.
अशा गोष्टींमध्ये सरकारला ही माहिती चुकीचीच मिळत असे किंवा काही चुकीच्या गोष्टीमुळे सरकारी
कर्मचाऱ्यांना देखील अडचणींचा सामना करावा लागत असे.

कुणबी जात प्रमाणपत्र वंशावळ पाहा…
शेतकऱ्यांच्या पिकांच्या नोंदणी नसल्यामुळे शासकीय मदत ही मधल्या मध्ये लाटली जात असे. अचूक नोंद शासन दप्तरी व्हावी, शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा व्हावा या दृष्टीने ई-पीक पाहणी अ‍ॅप निर्माण करण्यात आली आहे. याच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी कोणत्या गटामध्ये कोणते पीक घेतले आहे याची नोंद तर होणारच आहे शिवाय ते ठिकाण अक्षांश व रेखांश मध्ये नोंदले जाणार आहे.

ई-पीक पाहणी अ‍ॅप शेतकरी स्वतः आपल्या शेतातील पिकाची नोंदणी करणार असल्यामुळे त्या पिकाची योग्य माहिती सरकारला मिळणार आहे. तसेच ज्या क्षेत्रामध्ये तो उभा आहे तेथील अक्षांश व रेखांश नोंदवला जाणार आहे यामुळे सरकारला अचूक माहिती उपलब्ध होणार आहे.

पिकांच्या अचूक आकडेवारीमुळे भविष्यातील उत्पन्नाचा अंदाज बांधता येतो, यावरून भविष्यामध्ये लागणारी बी बियाणे खत हे पण उपलब्ध करून देता येते. शेतावरील गटनिहाय पिकामुळे जर शेतकऱ्याला त्याच्या नुकसान होत असेल तर ते अचूक रित्या त्याच्यापर्यंत पोहोचवता येऊ शकते.

ईपीक पाहणी ॲप इंस्टॉल करा

Leave a Comment