shri ram janmbhoomishri ram janmbhoomi

Ayodhya Shri Ram Mandir | अयोध्या श्री राम मंदीर

भगवान श्रीराम मंदिर, अयोध्या

जाणण्यायोग्य गोष्टी…

 1. भगवान श्रीराम यांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेची तारीख सोमवार 22 जानेवारी 2024 निश्चित झाली आहे.
 2. मात्र 15 जानेवारी रोजी भगवान श्रीरामांच्या बालरूपातील मूर्तीची स्थापना केली जाईल व 16 जानेवारीपासून मूर्ती स्थापना विधी सुरू होतील.
 3. 17 जानेवारी रोजी नूतन मूर्तीची अयोध्या नगरीतून मिरवणूक काढली जाईल.
 4. 18 जानेवारी पासून प्रत्यक्ष प्राणप्रतिष्ठा विधी प्रारंभ होईल.
 5. 19 जानेवारी रोजी राम मंदिरात यज्ञ अग्निकुंड स्थापण केला जाईल.
 6. 20 जानेवारी रोजी 81 कळस भरून शरयू नदीच्या पाण्याने मंदिराचे गर्भगृह धुऊन त्याचे शुद्धीकरण केले जाईल व संपूर्ण वास्तूची पूजा केली जाईल.
 7. 21 जानेवारीला रामलल्लाला 125 तीर्थक्षेत्रातील पाण्याने स्नान घालण्यात येईल.
 8. 22 जानेवारीला मध्यान्ह मृगाशिरा नक्षत्रात रामलल्लाचा अभिषेक होईल.
 1. श्री. गणेश शास्त्री द्रविड व श्री. लक्ष्मीकांत दीक्षित हे मुख्य पुजारी असतील.
 2. जवळपास 4000 संत व 3000 विशेष आमंत्रितांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न होणार. विशेष आमंत्रितांमध्ये सर्व समाजातील धर्मगुरू तसेच राजकारण, क्रीडा, चित्रपट, उद्योग इत्यादी अनेक क्षेत्रातील निवडक VVIP व्यक्तींना आमंत्रण असेल.
 3. मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेवेळी गर्भगृहामध्ये केवळ 5 व्यक्ती उपस्थित असतील – मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी, मा. मुख्यमंत्री (उ प्र) योगी आदित्यनाथ, संघप्रमुख मा. श्री. मोहनजी भागवत, राज्यपाल आनंदीबेन पटेल व मुख्य आचार्य.
 4. भगवान श्रीरामांच्या 3 मूर्ती तयार करण्यात आल्या आहेत, पैकी एका मूर्तीची निवड अनुभवी व्यक्तींमार्फत केली जाईल.
 5. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आचार्यांची 3 पथके स्थापन केली आहेत.
 6. काशीच्या श्री. गणेश शास्त्री द्रविड यांनी अभिषेकासाठी दि..22 जानेवारी रोजीची 84 सेकंदांची शुभ वेळ (मुहूर्त) निश्चित केला आहे. 12 वाजून 29 मिनिटे व 8 सेकंद ते 12 वाजून 30 मिनिटे 32 सेकंद पर्यंत हा मुहूर्त असेल.
 7. भगवान श्रीरामांच्या नवीन अचल मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेनंतर जुनी मूर्ती उत्सवमूर्ती म्हणून ठेवली जाईल व ती नवीन स्थापन केलेल्या मूर्तीच्या बाजूलाच बसविली जाईल. सर्व कार्यक्रमांना केवळ ही उत्सवमूर्ती बाहेर काढली जाईल.
 8. भाविकांना दर्शन व्यवस्थित घेता यावे या करिता रामलल्लाची मूर्ती जुन्या मूर्तीपेक्षा उंच अर्थात 51 इंच इतकी उंच केली आहे. 35 फूट अंतरावरून मूर्तीचे दर्शन घेता येईल.
 9. नवीन मूर्ती श्री. गणेश भट्ट, श्री. सत्यनारायण पांडे व श्री. अरुण योगीराज या तीन मूर्तिकारांनी बनविली आहे.
 10. प्राणप्रतिष्ठा सोहळ्या दरम्यान सुरक्षेची सहा पदरी आर्टिफिशिअल इंटेलिजन्सयुक्त जवळपास 600 कॅमेऱ्यांनी सज्ज अशी उच्च व्यवस्था असेल, जशी की G20 परिषदेवेळी होती.
  मुख्य मंदिराभोवती सर्वात कडक सुरक्षा व्यवस्था असणार आहे.
 11. 22 जानेवारी रोजी 1 लाखापेक्षा जास्त भाविकांची गर्दी होईल असा व्यवस्थेचा प्राथमिक अंदाज आहे.
 12. देश-विदेशातून मंदिराकरिता धान्य व वस्तूंच्या रुपात भेटवस्तूंचा ओघ सुरू झाला आहे.
 13. मंदिरातील घंटा अष्टधातूंपासून बनलेली असून तिचे वजन 2100 किलो इतके आहे. एका अंदाजानुसार ही देशातील सर्वात मोठी घंटा आहे. किंमत जवळपास 25 लाख रुपये!
 14. प्राणप्रतिष्ठेसाठी गुजरातमधील बडोदा येथुन 108 फूट लांब अगरबत्ती अयोध्येस पाठविली जात आहे. अगरबत्तीचे वजन जवळपास 3500 किलो असून ती एकदा पेटविली की दीड महिना जळत राहणार!
 15. सुरक्षेच्या कारणास्तव मा. मुख्यमंत्री श्री. योगी आदित्यनाथ यांचे आदेशानुसार निमंत्रितांशिवाय 22 जानेवारी रोजी कुणी अयोध्येत प्रवेश करू शकणार नाही.आदेशानुसार 22 जानेवारीचे सर्व धर्मशाळा व हॉटेल्समधील बुकिंग्ज असतील तर ती सर्व रद्द करण्यात येणार आहेत.
 16. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर सामान्य नागरिकांना अयोध्येत नेमके कधी जाता येईल याबाबत उत्तर प्रदेश सरकार सूचना देईल.
 17. मंदिराचे काम अद्याप पूर्ण झाले नाही. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतरही मंदिराचे काम सुरू राहणार आहे. 4000 पेक्षा जास्त कारागीर रात्रंदिवस मंदिर निर्माण करत असून सध्या मंदिरावर कळस लावण्याचे काम सुरू आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *