Ayodhya Shri Ram Mandir | अयोध्या श्री राम मंदीर
भगवान श्रीराम मंदिर, अयोध्या
जाणण्यायोग्य गोष्टी…
- भगवान श्रीराम यांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेची तारीख सोमवार 22 जानेवारी 2024 निश्चित झाली आहे.
- मात्र 15 जानेवारी रोजी भगवान श्रीरामांच्या बालरूपातील मूर्तीची स्थापना केली जाईल व 16 जानेवारीपासून मूर्ती स्थापना विधी सुरू होतील.
- 17 जानेवारी रोजी नूतन मूर्तीची अयोध्या नगरीतून मिरवणूक काढली जाईल.
- 18 जानेवारी पासून प्रत्यक्ष प्राणप्रतिष्ठा विधी प्रारंभ होईल.
- 19 जानेवारी रोजी राम मंदिरात यज्ञ अग्निकुंड स्थापण केला जाईल.
- 20 जानेवारी रोजी 81 कळस भरून शरयू नदीच्या पाण्याने मंदिराचे गर्भगृह धुऊन त्याचे शुद्धीकरण केले जाईल व संपूर्ण वास्तूची पूजा केली जाईल.
- 21 जानेवारीला रामलल्लाला 125 तीर्थक्षेत्रातील पाण्याने स्नान घालण्यात येईल.
- 22 जानेवारीला मध्यान्ह मृगाशिरा नक्षत्रात रामलल्लाचा अभिषेक होईल.
- श्री. गणेश शास्त्री द्रविड व श्री. लक्ष्मीकांत दीक्षित हे मुख्य पुजारी असतील.
- जवळपास 4000 संत व 3000 विशेष आमंत्रितांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न होणार. विशेष आमंत्रितांमध्ये सर्व समाजातील धर्मगुरू तसेच राजकारण, क्रीडा, चित्रपट, उद्योग इत्यादी अनेक क्षेत्रातील निवडक VVIP व्यक्तींना आमंत्रण असेल.
- मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेवेळी गर्भगृहामध्ये केवळ 5 व्यक्ती उपस्थित असतील – मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी, मा. मुख्यमंत्री (उ प्र) योगी आदित्यनाथ, संघप्रमुख मा. श्री. मोहनजी भागवत, राज्यपाल आनंदीबेन पटेल व मुख्य आचार्य.
- भगवान श्रीरामांच्या 3 मूर्ती तयार करण्यात आल्या आहेत, पैकी एका मूर्तीची निवड अनुभवी व्यक्तींमार्फत केली जाईल.
- या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आचार्यांची 3 पथके स्थापन केली आहेत.
- काशीच्या श्री. गणेश शास्त्री द्रविड यांनी अभिषेकासाठी दि..22 जानेवारी रोजीची 84 सेकंदांची शुभ वेळ (मुहूर्त) निश्चित केला आहे. 12 वाजून 29 मिनिटे व 8 सेकंद ते 12 वाजून 30 मिनिटे 32 सेकंद पर्यंत हा मुहूर्त असेल.
- भगवान श्रीरामांच्या नवीन अचल मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेनंतर जुनी मूर्ती उत्सवमूर्ती म्हणून ठेवली जाईल व ती नवीन स्थापन केलेल्या मूर्तीच्या बाजूलाच बसविली जाईल. सर्व कार्यक्रमांना केवळ ही उत्सवमूर्ती बाहेर काढली जाईल.
- भाविकांना दर्शन व्यवस्थित घेता यावे या करिता रामलल्लाची मूर्ती जुन्या मूर्तीपेक्षा उंच अर्थात 51 इंच इतकी उंच केली आहे. 35 फूट अंतरावरून मूर्तीचे दर्शन घेता येईल.
- नवीन मूर्ती श्री. गणेश भट्ट, श्री. सत्यनारायण पांडे व श्री. अरुण योगीराज या तीन मूर्तिकारांनी बनविली आहे.
- प्राणप्रतिष्ठा सोहळ्या दरम्यान सुरक्षेची सहा पदरी आर्टिफिशिअल इंटेलिजन्सयुक्त जवळपास 600 कॅमेऱ्यांनी सज्ज अशी उच्च व्यवस्था असेल, जशी की G20 परिषदेवेळी होती.
मुख्य मंदिराभोवती सर्वात कडक सुरक्षा व्यवस्था असणार आहे. - 22 जानेवारी रोजी 1 लाखापेक्षा जास्त भाविकांची गर्दी होईल असा व्यवस्थेचा प्राथमिक अंदाज आहे.
- देश-विदेशातून मंदिराकरिता धान्य व वस्तूंच्या रुपात भेटवस्तूंचा ओघ सुरू झाला आहे.
- मंदिरातील घंटा अष्टधातूंपासून बनलेली असून तिचे वजन 2100 किलो इतके आहे. एका अंदाजानुसार ही देशातील सर्वात मोठी घंटा आहे. किंमत जवळपास 25 लाख रुपये!
- प्राणप्रतिष्ठेसाठी गुजरातमधील बडोदा येथुन 108 फूट लांब अगरबत्ती अयोध्येस पाठविली जात आहे. अगरबत्तीचे वजन जवळपास 3500 किलो असून ती एकदा पेटविली की दीड महिना जळत राहणार!
- सुरक्षेच्या कारणास्तव मा. मुख्यमंत्री श्री. योगी आदित्यनाथ यांचे आदेशानुसार निमंत्रितांशिवाय 22 जानेवारी रोजी कुणी अयोध्येत प्रवेश करू शकणार नाही.आदेशानुसार 22 जानेवारीचे सर्व धर्मशाळा व हॉटेल्समधील बुकिंग्ज असतील तर ती सर्व रद्द करण्यात येणार आहेत.
- प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर सामान्य नागरिकांना अयोध्येत नेमके कधी जाता येईल याबाबत उत्तर प्रदेश सरकार सूचना देईल.
- मंदिराचे काम अद्याप पूर्ण झाले नाही. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतरही मंदिराचे काम सुरू राहणार आहे. 4000 पेक्षा जास्त कारागीर रात्रंदिवस मंदिर निर्माण करत असून सध्या मंदिरावर कळस लावण्याचे काम सुरू आहे…