दररोज घरामध्ये देवपुजा का करावी? | Why should you do deva puja at home every day?

दररोज घरामध्ये देवपुजा का करावी? | Why should you do deva puja at home every day?

वातावरणात दोन प्रकारच्या ऊर्जा असतात एक सकारात्मक ऊर्जा आणि एक नकारात्मक उर्जा (मनाची उर्जा). जर का घरामध्ये/मनामध्ये नकारात्मक ऊर्जेने प्रवेश केला तर घरामध्ये चिडचिड होणे, वाद होणे, उदास वाटणे, एकमेकांसोबत संबंध बिघडणे, कुठलंही काम मनासारखं न घडणे, कोणत्याही कार्यामध्ये सतत अपयश येणे अशा घटना वारंवार घडत राहतात त्यामुळे घरातील वातावरण पूर्णपणे बिघडून जाते.

परंतु घरामध्ये/मनामध्ये सकारात्मक उर्जा असेल तर घरातील वातावरण हे नेहमीच प्रसन्न आणि आनंददायी असेल. घरातले वातावरण हे नेहमी सकारात्मक ऊर्जेने भरून राहण्यासाठी दैनंदिन देवपूजा हिंदुंच्या प्रत्येक घरामध्ये झाली पाहिजे.

देवपूजेमुळे घरातील सकारात्मक उर्जा टिकुन राहण्यासाठी मदत होते… त्यासाठी हिंदू धर्मामध्ये दोन वेळेस सकाळ संध्याकाळ देवपूजा करण्याची प्रथा, पद्धत आपल्या पूर्वजांनी करून ठेवलेली आहे.

उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या व्यक्तीने आपल्याला शिवीगाळ केली अथवा वाईट बोलली तर आपल्या शरीरामध्ये लगेचच बदल व्हायला सुरुवात होते जसे की श्वासोच्छवास वाढणे राग येणे शरीराला कंप सुटणे हे का घडतं तर समोरच्याने जे शब्द वापरले त्याचा परिणाम आपल्या शरीरावर लगेच होतो व आपले शरीर लगेच हार्मोन्स मध्ये बदल करते त्याचे परिणाम दिसायला लागतात.

तसंच स्तोत्र मंत्र पठण करण्यामुळे सुद्धा आपल्या शरीरामध्ये सकारात्मक बदल घडतात आणि त्याचे दुरोगामी परिणाम आपल्याला दिवसभर जाणवतात जसे की मन प्रसन्न राहणे. कुणी जरी आपल्या वाईट भाषा वापरली तरीही आपल्यावर त्या व्यक्तीच्या शब्दांचा कसलाही परिणाम न होणे म्हणजे ते व्यक्तीने वाईट बोलल्यामुळे आपल्याला राग येत नाही. त्यामुळे कोणाशी वाद होत नाही. अशा कठीण परिस्थितीतही त्या समोरच्या व्यक्ती सोबत आपण सकारात्मक संवाद साधतो. हे तेव्हाच घडतं जेव्हा तुमचं मन प्रसन्न आणि सकारात्मक असत.

हे तुम्ही सकाळी केलेल्या देवपूजा व स्तोत्रपठनाचे परिणाम असणार आहेत. त्यानंतर पुन्हा १२ तासाने आपल्याला संध्याकाळची देवपूजा करायची आहे आणि जर कुटुंबातल्या सर्वांनी एकत्र बसून सामुहिक संध्यापूजा जर केली तर त्याचे सकारात्मक परिणाम तुमच्या कुटुंबामध्ये तुम्हाला दिसून येतील कुटुंबामध्ये कधीही नकारात्मक विचार येणार नाहीत ते कुटुंब कायम आनंदी असेल यासाठी तुम्ही दैनंदिन देवपूजा करणे खूप गरजेचे आहे.

आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये काही स्तोत्र मंत्र यांची रचना आपल्या पूर्वजांनी ऋषीमुनींनी (शास्त्रज्ञ) यांनी खूप अभ्यास करून बनवलेली आहे जसं की गायत्री मंत्र, रामरक्षा स्तोत्र, मारुती स्तोत्र जर तुम्ही या स्तोत्रांच मंत्रांच पठन दररोज केलं तर तुमच्या शरीरातल्या अँटीबोडीज ऍक्टिव्ह होतात. रोगप्रतिकारक शक्ती वाढते गायत्री मंत्राच पठन अतिशय स्वच्छ स्वरामध्ये केल्यास पोटापासून ते छाती डोकं या ठिकाणी व्हायब्रेशन्स क्रियेट होतात, कंपन निर्माण होतात, त्या कंपनांमुळे तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या पेशी मोठ्या प्रमाणात सक्रिय होतात त्यामुळे तुम्ही कधीही आजारी न पडण्याचा फायदा तुम्हाला होतो.

विचार करा, आपल्या पूर्वजांनी शरीरशास्त्र मानसशास्त्राचा किती गाढा अभ्यास करून आपल्यासाठी या सगळ्या गोष्टी करून ठेवलेल्या आहेत. पण आपल्याला त्या माहीत नसल्या कारणामुळे, कुणीही न शिकवल्यामुळे आज त्या दुर्लक्षित आहेत अथवा त्या अंधश्रद्धा आहेत. तरी याचा तुम्ही सहा महिने दैनंदिन न चुकता स्तोत्रमंत्राचं पठण करून अनुभव घेऊ शकता.

लक्षात ठेवा प्रत्येक हिंदूंनी आपल्या घरामध्ये सकाळी संध्याकाळी देवपूजा केली पाहिजे प्रत्येक सण उत्सव हे अतिशय उत्साहाने व आनंदाने साजरे करायला पाहिजेत.त्यामुळे लहान मुलांनाही हिंदू संस्कृतीची माहिती मिळेल व ते कधीही वाईट आचरण करणार नाहीत, चुकीचे वागणार नाहीत….

49 thoughts on “दररोज घरामध्ये देवपुजा का करावी? | Why should you do deva puja at home every day?”

  1. Исследуйте воздушное пространство в игре Авиатор
    2. Достигайте высоты в игре Авиатор
    3. Покоряйте небо в игре Авиатор
    4. Отправляйтесь в путешествие в игре Авиатор
    5. Откройте для себя тайны игры Авиатор
    6. Найдите свое предназначение в игре Авиатор
    7. Научитесь летать в игре Авиатор
    8. Приготовьтесь к веселой игре Авиатор
    9. Узнайте больше о видах самолетов в игре Авиатор

    Reply

Leave a Comment