पॅन कार्ड होणार डी ऍक्टिव्हेट | PAN card will be deactivated

पॅन कार्ड होणार डी ऍक्टिव्हेट | PAN card will be deactivated

काही व्यक्तींनी एकापेक्षा अधिक पॅन कार्ड काढल्याचे समोर आले आहे. तर एकच पॅन कार्ड अनेकांच्या नावे असल्याची प्रकरणीही केंद्रीय प्रत्यक्ष कर नियंत्रण मंडळाच्या निदर्शनास आली आहेत. त्यामुळे आधार पॅन लिंकिंग चा निर्णय घेण्यात आला.

यंत्रणेवर ताण

आधार पॅन कार्ड लिंकिंग ची मुदत संपल्याने संभ्रम वाढला आहे. लिंकिंग साठी 30 जून रोजी अखेरचा दिवशी झुंबड उडाली होती. यांचा यंत्रणे वर ही ताण आला होता. एक हजार रुपये शुल्क भरूनही अनेक करदात्यांचे आधार पॅन लिंक होऊ शकले नाही.

1000 दंड भरल्यास महिन्यात ऍक्टिव्ह होणार पॅन कार्ड

आधार पॅन लिंकिंग साठी मुदतवाढ मिळाली नसली तरी घाबरण्याचे कारण नाही. एक हजार रुपये दंड भरून आधार प्रणालीकडे आपण लिंकिंग साठी अर्ज करू शकता. चलन भरल्यानंतर आपले पॅन कार्ड एक महिन्यात पुन्हा सुरू होणार आहे.

पॅन कार्ड बंद झाल्यास काय होणार

  • पाच लाखाहून अधिक किमतीचे सोने खरेदी करता येणार नाही.
  • बँकेत एकावेळी 50 हजाराहून अधिक रक्कम जमा करता येणार नाही आणि काढताही येणार नाही.
  • विवरण पत्रे भरता येणार नाहीत.
  • कोणत्याही आर्थिक व्यवहारात प्यान अभावी अडचणी येणार आहेत.
  • शासकीय योजनांचा लाभ घेता येणार नाही.
  • म्युच्युअल फंडासह अन्य वित्तीय योजनात गुंतवणूक करता येणार नाही.

दहा हजार दंड

आधार पॅन लिंकिंग साठी 30 जूनही अंतिम तारीख होती. मुदत वाढ न मिळाल्यामुळे पॅन कार्ड डीऍक्टिव्हेट होणार आहेत. पॅन कार्ड डी ऍक्टिव्हेट झाल्यानंतर संबंधितांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. म्युचल फंड, स्टॉक मार्केटमध्ये अकाउंट उघडता येणार नाही. दस्तावेज म्हणून पॅन कार्डचा वापर केल्यास आयकर विभागाकडून दहा हजार रुपये दंड थोपवण्यात येणार आहे.

1 जुलैपासून कोणते बदल

डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या माध्यमातून विदेशात पेमेंट करत असल्यास 20 टक्के कर भरावा लागणार आहे. टॅक्स कलेक्शन सोर्स टीसीएसच्या माध्यमातून हा कर वसूल केला जाणार आहे. सात लाखाहून अधिक खर्च करणाऱ्या ग्राहकाला 20% टीसीएस द्यावा लागणार आहे. टपालखात्यातील ठेवी मुदत ठेवी, आवर्त ठेव, आरडी आधी काही निवडक अल्पबचत योजना वरील व्याज दरात शनिवारपासून वाढ करण्यात आली आहे. पेट्रोल डिझेल गॅसचे दर जैसे थे. एक जुलै रोजी पेट्रोल, डिझेलचं , गॅसचा बाबतीत चा निर्णय घेतला जातो, या महिन्यात मात्र इंधन आणि गॅसचे दर जैसे ठेवण्यात आले आहेत.

Leave a Comment