what are stimulatorswhat are stimulators
What are stimulators or hormones? | संप्रेरके वा हार्मोन्स म्हणजे काय ?

What are stimulators or hormones? | संप्रेरके वा हार्मोन्स म्हणजे काय ?

शरीरात अनेक ग्रंथी असतात. काही ग्रंथींचा स्राव नलिकेद्वारे बाहेर सोडला जातो. (जसे अश्रु निर्माण करणारी ग्रंथी) तर काहीं चा स्राव मात्र रक्तात सोडला जातो. दुसर्‍या प्रकारच्या ग्रंथींना अंत:स्रावी ग्रंथी असे म्हणतात. या ग्रंथींच्या स्रावावर मज्जासंस्था, रक्तातील रासायनिक घडामोडी यांचे नियंत्रण अवलंबुन असते.

अंत:स्रावी ग्रंथींमधुन संप्रेरके वा हार्मोन्स रक्तात सोडली जातात. त्यामुळे संप्रेरकांचा परिणाम संपूर्ण शरीरभर दिसुन येतो. संप्रेरके म्हणजे विशिष्ट प्रकारचे कार्य करणारे रासायनिक पदार्थ होत. संप्रेरकाची रक्तातील पातळी ठराविक प्रमाणातच असावी लागते. अन्यथा शरीरा वर त्याचे गंभीर परिणाम होतात. काही संप्रेरकांविषयी आता माहिती घेऊ.

मेंदुतील पिट्युटरी ग्रंथीपासुन वाढीसाठी आवश्यक असलेला संप्रेरक रक्तात सोडला जातो. या संप्रेरकामुळे शरीराची वाढ होते, शिवाय इतर संप्रेरक ग्रंथी वर नियंत्रणही ठेवले जाते. गल ग्रंथीतुन थायलाॅक्झीन नावाचे संप्रेरक तयार होते. हेही वाढी साठी आवश्यक असते, तसेच ते शरीरातील रासायनिक घडामोडींवर नियंत्रण ठेवते. मुत्रपिंडा वरील अॕड्रेनल ग्रंथीतुन स्टेराॅइड संप्रेरके तयार होतात. ही संप्रेरके रासायनिक घडामोडीं वर नियंत्रण करतात व अचानक हालचालीसाठी शरीराला तयार करतात.

स्वादु पिंडात तयार होणारे इन्सुलिन ग्लुकोजच्या ज्वलनासाठी तसेच रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी आवश्यक असते. बीजांडातुन स्रवणार्‍या स्त्री व पुरुष संप्रेरका मुळे व्यक्तीत स्त्री व पुरुष याची विशिष्ट लक्षणे आढळुन येतात. यांच्या प्रभावाखाली शुक्राणुंची निर्मिती होते. तसेच मासिक पाळीची सुरुवात होते. गर्भधारणेसाठीही ही संप्रेरके आवश्यक असतात.

अशी अनंत महत्वाची कामे करणार्‍या या संप्रेरकांचे रक्तातील प्रमाण खूपच अल्प म्हणजे १०० मि.ली. ला १ मि. ग्रॅ. १००० चा भाग वा त्याहूनही खूप कमी असते. त्यामुळे ‘मूर्ती लहान, पण किर्ती महान’ ही उक्ती संप्रेरकांना तंतोतंत लागू पडते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *