Solve "PR_END_OF_FILE_ERROR"Solve "PR_END_OF_FILE_ERROR"

Varied fruitful worship of Suryanarayana

सूर्योपासना हा भारतवर्षाचा प्राण आहे. आपल्या ऋषीमुनींनी साधना करून सूर्योपासनेचे लाभ मिळवलेले आहेत…..

भगवान सूर्यनारायण धर्मपरायण असल्याने त्याचा आदर्श घेणे आवश्यक…. !

पृथ्वीवरील मनुष्यप्राण्याला प्रत्यक्ष डोळ्यांनी दिसणारा देव, म्हणजेच भगवान सूर्यनारायण होय. पृथ्वीवरील सर्व जिवांचा एकमेव आधार असणार्‍या सूर्यनारायणाच्या निवासस्थानास सूर्यलोक असे म्हणतात… आपण सर्वांनीच सूर्याचा आदर्श घेण्यासारखा आहे; कारण सूर्यदेव आपले नित्यक्रम (धर्माचरण) कधीच पालटत नाही…..

सूर्यनारायण या विशेषणाने त्याचा सन्मान धर्मलोकातूनही केला जातो. सूर्य जसा नारायण आहे तसाच तो धर्मपरायणही आहे; म्हणूनच आदर्श असावा, तर केवळ या सूर्याचाच…. !

सूर्यदेव हा आपल्या हिंदु संस्कृतीचा प्राण आहे… इतरत्रची कुठलीही संस्कृती आणि आपली सनातन संस्कृती यांत हाच एक फार मोठा भेद आहे. सूर्यदेव हा पंचांगाचा आधारात्मा आहे…..

सूर्य हा ब्रह्मांडाचा नियंत्रक असल्याने भारतवर्षातील ऋषीमुनी, सिद्ध महात्मे आणि संत यांनी सूर्योपासनेचा दंडक घालून दिलेला असणे, सूर्य हा सर्वांत तेजस्वी, सामर्थ्यवान, युक्तीवान, बुद्धीवान आणि सर्वज्ञ असा सृष्टीचा जगत्चालक असून, तो संपूर्ण ब्रह्मांडाचा नियंत्रक आहे… त्याच्या उगवण्याने संपूर्ण सृष्टी आपोआपच जागृत होऊन पिवळ्या चैतन्याने न्हाऊन निघते; म्हणूनच सूर्यास्तानंतर घराघरातून तुळशीपाशी दिवे लावले जातात. सूर्य आपले तेज आणि शक्ती सायंकाळी देवाजवळच्या दिव्याला देऊन जातो; म्हणून देवापाशी दिवा लावावा…..

सर्व हिंदूंचा दिवस सूर्योदयापासून चालू होतो आणि संपतोही सूर्यास्तानंतरच; म्हणून आपल्या भारतवर्षातील ऋषीमुनी, सिद्ध महात्मे अन् संत यांनी सूर्योपासनेचा दंडक घालून दिलेला आहे…..

सर्वांचा उद्धार कसा करावा ? याचे शिक्षण देणारा आदर्श शिक्षक – सूर्यनारायण ! पृथ्वीवरील हवा, पाणी, अग्नी, तेज, उष्णता, शुद्धता, स्वच्छता आणि पवित्रता यांचा उगमस्रोत सूर्यच आहे… त्यामुळे प्रतिदिन या सर्व घटकांच्या संयुक्त प्रक्रियेद्वारे वातावरण सूर्यकिरणांतून शुद्ध होत जाऊन जीवसृष्टीचे संरक्षण होण्यासाठी साहाय्य होत आहे. हे कार्य घडवून आणण्याचे अखंडत्व सूर्यदेवाने जोपासून ठेवले आहे; म्हणूनच जोपासना कशी करावी ? हे मर्म सूर्योपासनेतूनच शिकून पृथ्वीवर आम्हा सर्वांचाच उद्धार कसा करावा ? याचे शिक्षण देणारा खरा आदर्श शिक्षक सूर्यनारायण ठरतो…..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *