फिंगर प्रिंट्स म्हणजे काय ? | What are finger prints?

फिंगर प्रिंट्स म्हणजे काय ? | What are finger prints?

फिंगर प्रिंट्स म्हणजे काय ? | What are finger prints?

अनेक वेळा तुम्ही फिंगर प्रिंटबद्दल ऐकले असेल. एखाद्या हिंदी चित्रपटात खून करून पळालेल्या वा खून केल्याचा संशय असलेल्या व्यक्तीच्या हाताच्या बोटांचे ठसे बुद्धिमान पोलिस इन्स्पेक्टर कोणत्या तरी निमित्ताने (जसे त्याचा पाणी प्यायलेला ग्लास मिळवून वगैरे!) घेतानाही तुम्ही पाहिले असेल. त्याच्या हुशारीला दादही दिली असेल. हाताच्या बोटांच्या ठशांचा खरेच काही उपयोग होतो का, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. आधी हे लक्षात घेऊ की, बोटांच्या शेवटच्या पेरावर असलेल्या उंचवटे व खोलगट भागांवर हे फिंगर प्रिंट अवलंबून असतात. तुमची बोटे स्वच्छ धुवा. नंतर एखादे भिंग घेऊन त्याखाली बोटे बघा. तुम्हाला असे दिसेल की, वोटांवर चित्रात दाखवल्याप्रमाणे आकार दिसतील.

यांना अनुक्रमे आर्च (पद्म), लुप (शंख), व्हर्ल (चक्र) व काम्पोझिट (संमिश्र) आकार असे म्हणतात. बाह्यत्वचा व अंत: त्वचेवर असणाऱ्या उंचवटे व खोलगट भागांवर हे आकार अवलंबून असतात. हे जन्मल्यापासून दिसून येतात व आयुष्यभर बदलत नाहीत. त्वचा जर नष्ट झाली तर मात्र तेही नष्ट होतात. शंख, चक्र, पद्म व संमिश्र आकार यांच्या विविध रचना तयार होतात. दोन व्यक्तींचे फिंगर प्रिंटसारखे असणे केवळ अशक्यच असते. दोन व्यक्तींचे फिंगर प्रिंट्स सारखे असण्याची शक्यता एकास चौसष्ट हजार दशलक्ष इतकी कमी असते.

म्हणजे जगाच्या लोकसंख्येच्या तिसपट लोकसंख्येतच दोन व्यक्तींचे फिंगर प्रिंट्स सारखे असू शकतात. या वैशिष्ट्यामुळे गुन्हेगार पकडण्यासाठी ठशांचा खूप उपयोग होतो. कोणत्याही वयात ते बदलत नाहीत. हाताच्या बोटाची त्वचा शाबूत असलेल्या मृतदेहाचेही फिंगर प्रिंट्स घेता येतात. त्यामुळे व्यक्तीची खात्रीशीरपणे ओळखत पटवता येते.

एवढेच नाही तर, सांकेतिक भाषेत त्यांची माहिती एका ठिकाणाहून दुसरीकडे पाठवता येते. साहजिकच त्यामुळे बँकेतून पैसे काढताना निरक्षर व्यक्तीच्या अंगठ्याचा ठसा घेतात. नोकरीत कायम झालेल्या व्यक्तीच्या सर्व बोटांचे ठसे घेऊन ठेवतात. चोर पकडल्यावर पोलिसही त्याच्या बोटांचे ठसे घेऊन ठेवतात. ओळख पटविण्यासाठी त्याचा पुढे उपयोग करतात. फिंगर प्रिंट्सच्या आधारे अनेक गुन्ह्यातील खरा गुन्हेगार पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

Healthy WOMEN | खास महिलांसाठी सुंदर व उपयुक्त संदेश

वाढत जाणारे वजन, दुखणारे गुडघे, पित्ताचा त्रास, कंबरदुखी, पाळीचा त्रास, कमी हिमोग्लोबिन, दम लागणे, टाचा प्रचंड दुखणे, रात्री झोप न येणे, अनामिक दडपण जाणवणे, केस गळणे, भेगा पडणे, त्वचा कोरडी कोरडी होत जाणे अशा असंख्य तक्रारी शरीरात मुक्कामी येऊ लागतात.

या तक्रारींपासून लांब जाण्याची इच्छा सगळ्यांनाच असते पण खरंच यासाठी वेळ कुठून आणायचा? हाच यक्षप्रश्न सुटत नसतो.

या सगळ्या fire fighting lifestyle मध्ये जर आपलं निरोगीपण टिकलं तर आणि तरच या अष्टभुजा नारायणीचा वरदहस्त मिळून Super woman होता येईल!

Energy boosting:

पाव किलो खारीक पावडर, पन्नास ग्रॅम खायचा डिंक एकत्र करून हे mixture 2 चमचे दुधात mix करून आपल्यासाठी रोज सकाळी खाण्यासाठी cerelac तयार करता येईल.

दोन वेळा शतावरी कल्प दुधातून घेऊन ही energy level maintain ठेवता येईल.

बस्स पांच मिनिटवाला नाश्ता with देशी अंदाज:

नाश्ता compulsory प्रकारात घेऊन त्यासाठी मेतकूट भात, तुपसाखर पोळी, लोणी-साखर पोळी, राजगिरा लाही व दुध, लाह्यांचे पीठ व ताक, नाचणी पेज किंवा खीर,भाकरी भाजी, पुलाव, थालीपीठ, उपमा, शेवई उपमा यासारखा अस्सल देशी menu नक्की करायचा.

ओट्स, कॉर्नफ्लेक्स, packed juices, बेकरी पदार्थ, शिळे पदार्थ, मॅगी यांना ठामपणे “NO” म्हणायचे.

किचन क्लिनिक:

फोडणी करतांना हिंग, मेथी दाणे, हळद, कडीपत्ता पानांची पावडर भरपूर वापरून हाडांचे विकार आणि पाळीचा त्रास दूर सरतील.

एक वेळेच्या जेवणात वरण, भात, तूप, लिंबू हे combination आणि लोखंडी कढईत भाजी म्हणजे anaemia ला bye bye
ज्वारीची भाकरी व फळभाजी नक्की केली की पचनाच्या तक्रारी चक्क गायब.

कणकेत चिमूटभर चुना add करून, कडीपत्ता चटणी, जवस चटणी, तीळ चटणी, शेवगा भरपूर वापरून हाडांना strong ठेवता येईल.

*Fitness मंत्र :

सकाळी थोडासा वेळ दिर्घश्वसनासाठी देऊन फुफ्फुस पोटांच्या स्नायूंचा व्यायाम सहजच होईल. सकाळी उठल्यानंतर किंवा संध्याकाळी जेवणाआधी 2 तास. दिवसभर वापरायची चप्पल ही चामड्याची घेऊन रोज त्यावर एरंड तेलाचा कापसाचा बोळा फिरवून ती चप्पल दिवसभर वापरून टाचदुखी ला कायमचा निरोप देऊया.

==============
सगळ्यांना आपण आनंदी ठेवतोच पण स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी मनमोकळ्या गप्पा मारणाऱ्या मित्र-मैत्रिणी शोधून खूप हसूया.

आपल्यात लपलेल्या सुप्त गुणांना, मनाच्या खॊल कप्प्यात दडलेल्या आवडीला या निमित्ताने वर काढूया. स्वतःची ओळख घडवून आणत, निरामयतेच्या वाटेने जाता जाता “फिरुनी नवे जन्मेन मी” हे promise स्वतःशीच करूया !

Leave a Comment