vihir – विहीर अनुदान योजना – २०२४
विहिरीसाठी करा ऑनलाईन अर्ज – मनरेगाच्या माध्यमातून चार लाख रुपये मिळणार….
मनरेगाच्या माध्यमातून सिंचन विहिरीसाठी लाभार्थी कुटुंबास तब्बल चार लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे यासाठी तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकरी लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन गटविकास अधिकारी गगनबावडा यांनी केली आहे यापूर्वी विहिरीसाठी ग्रामपंचायत इकडे अर्ज करण्याचा पर्याय देण्यात आला होता मात्र आता राज्याच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने गुगल प्ले स्टोअर मधून महा इजीएस हॉर्टिकल्चर ऑब्लिक वेल एप्लीकेशन यावरती उपलब्ध करून दिले आहे यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांना घरबसल्या अर्ज करणे सोपे झाले आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या वार्षिक कृती आराखड्यात विहीर खोदायी ला प्राधान्य देण्यात आले आहे विहिरीसाठी तीन टप्प्यात अनुदान देण्यात येणारा असून खोदाई पूर्वी तसेच खोदाई 30 ते 60 टक्के झालेले असताना व शेवटी खोदावी पूर्ण झाल्यानंतर मिळणार आहे मंजूर लाभार्थ्यांनी लवकरात लवकर कागदपत्रे पंचायत समिती येथे जमा करावेत मंजूर विहिरींचे काम माझ्या पूर्ण करावे नवीन विहिरीसाठी ऑफलाइन किंवा ऑनलाईन अर्ज सादर करावे
विहीर अनुदान योजना – २०२४ – आवश्यक बाबी
लाभधारक हा अनुसूचित जाती किंवा अनुचित अनुसूचित जमाती किंवा भटक्या जमाती विमुक्त जाती दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी स्त्री करता असलेली कुटुंबे विकलांग व्यक्ती करता असलेली कुटुंबे जमीन सुधारणांचे लाभार्थी इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी सीमांत शेतकरी 2.5 एकर पर्यंत शेतजमीन अल्पभूधारक शेतकरी पाच एकर पर्यंत शेतजमीन यांनी कशावर निवड केली जाईल अर्जदाराकडे एक एकर शेत जमीन सलग असावी लाभ धारकाच्या सातबारावर या आधीच विहिरीची नोंद असू नये आठ उतारा असावा अर्जदार हा जॉब कार्ड धारक असला पाहिजे
विहीर अनुदान योजना – २०२४ – अर्ज कुठे कसा करायचा
विहीर अनुदान योजनेसाठी अर्ज ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मोबाईलच्या गुगल प्ले स्टोअर मधून MAHA-EGS,Horticulture/Well एप्लीकेशन डाउनलोड करून त्याद्वारे अर्ज करू शकता किंवा जवळील महा-ई-सेवा केंद्र किंवा आपले सरकार सेवा केंद्राला भेट देऊन विहीर अनुदान योजनेसाठी अर्ज भरू शकता अधिक माहितीसाठी ग्रामसेवक ग्राम रोजगार सेवक व तालुका विस्तारावर तांत्रिक सल्लागारांची संपर्क साधावा.