एकादशीला / उपवासाच्या दिवशी सत्यनारायणाची पूजा करावी का ? Should Satyanarayana be worshiped on Ekadashi/fasting day?
सत्यनारायणाच्या पूजेचा प्रसाद हा रवा, गूळ किंवा साखर, तूप हे सर्व पदार्थ सव्वा प्रमाणात घ्यावेत हे कथेमध्ये स्पष्ट शब्दात सांगितले आहे. आणि आपण पोथीत बदल तर करू शकत नाही. (म्हणजेच प्रसादात बदल करता येत नाही). तसेच व्रत समाप्त झाल्यावर हजर असलेल्या सर्वांनी प्रसाद ग्रहण करणे हे ही बंधनकारक आहे. (कथेतच प्रसाद न घेतल्यामुळे नौका बुडाली, साधुवाणीचा जावई बुडाला, अंगध्वज राजांचे पुत्र व राज्य नाश पावते इत्यादी प्रसंगांचे वर्णन केले आहे). त्यामुळे एकादशीला / उपवासाच्या दिवशी सत्यनारायणाची पूजा केली तर ज्या कोणाला उपवास असेल तर त्यांनी उपवास मोडून प्रसाद खावाच लागेल. हे मान्य असल्यास एकादशीला सत्यनारायणाची पूजा अवश्य करावी .
पण एक गोष्ट लक्षात घ्या की एका महिन्याच्या ३० दिवसातील ५ दिवस उपवास आहेत हे गृहीत धरले तरी उरलेल्या २५ दिवस आपण सत्यनारायण करू शकतो.