ChatGPTChatGPT

आता ए आय करणार वकिली । Now AI will advocate

ओपन ए आईचे चॅट जीपीटी (ChatGPT), मायक्रोसॉफ्टचे बिंग(Microsoft Bing) आणि गुगलच्या बारड (brad AI) सारख्या चॅटबोटच्या धर्तीवर आता कायद्याच्या क्षेत्रातील लीगल जीपीटी बनवण्याची तयारी आपल्याच देशात सुरू आहे. इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी आणि टेक्नॉलॉजी लॉ मध्ये यावर्षी एलएलएम केलेल्या चेन्नईच्या कपिल नरेश यांनी आताही आणखी एका प्रकारचे एलएलएम करण्याची तयारी केली आहे. हे एलएलएम म्हणजे लार्ज लँग्वेज मॉडेल हे एक प्रकारचे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे जे चॅटबोट सारखेच असेल. 23 वर्षांचे नरेश ही एका कायदेशीर सल्लागार फर्मचे संस्थापक ही आहेत. आता ते चॅट जीपीटीच्या धरतीवर लीगल जीपीटी बनवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

हा एक असा प्लॅटफॉर्म असेल जो आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या माध्यमातून केस रिसर्च पासून एफ आय आर चार्जशीट ड्राफ्ट करण्यासाठी तसेच कोर्टातील युक्तिवाद बनवण्यासाठी चे काम करील. एखादा दिग्गज वकील जे करेल ते सर्व हे लीगल जीपीटी करू शकेल. नरेशी यांनी सांगितले की सध्या लीगल जीपीटी हे केवळ पहिल्या वर्षात शिकणाऱ्या कायद्याच्या विद्यार्थ्यांसारखेच आहे. त्याला आणखी तयार केले तर ते माझ्यासारख्या नवख्या वकिलाइटके काम करू शकेल. मी लीगल जीपीटीला इतके मजबूत बनवून इच्छितोजी सर्वोच्च न्यायालयातील नामांकित वकिलांसारखे काम करू शकेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *