Kunbi Caste Certificate Genealogy| कुणबी जात प्रमाणपत्र वंशावळी
पश्चिम भारतातील पारंपारिक शेतकऱ्यांच्या अनेक जातींना कुणबी (पर्याय्याने काणबी) हा एक सामान्य शब्द लागू होतो. हा समुदाय जास्तीत जास्त महाराष्ट्रात आढळतो. मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक, केरळ व गोवा राज्यात देखील हा समुदाय आढळतो. महाराष्ट्रातील इतर मागासवर्गीयांमध्ये (ओबीसी) कुणबींचा समावेश होतो. 19व्या शतकापूर्वी मराठा-कुणबी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रीयन कृषी जातींच्या मोठ्या गटाबद्दल फारच कमी माहिती नोंदवण्यात आली आहे.
Are Kunbi and Maratha the same? | कुणबी व मराठा एकच आहे का ?
छ. शिवाजी महाराजांच्या अधिपत्याखालील मराठा साम्राज्याच्या सैन्यात सेवा करणारे बहुतेक मावळे याच समाजातील होते. चौदाव्या शतकात आणि नंतरच्या काळात अनेक कुणबी ज्यांनी विविध राज्यकर्त्यांच्या सैन्यात लष्करी पुरुष म्हणून नोकरी पत्करली होती त्यांनी संस्कृतीकरणाची प्रक्रिया पार पाडली आणि ते स्वतःला मराठा म्हणून ओळखू लागले. वसाहतीच्या परिणामांमुळे 20 व्या शतकाच्या सुरुवातीला मराठा आणि कुणबी यांच्यातील सीमा अस्पष्ट बनली आणि दोन गट मिळून मराठा-कुणबी (Maratha Kunbi)असा एक गट तयार झाला. खैरलांजी हत्याकांडात कुणबी आणि दलित समुदायांमधला जातीय तणाव दिसून आला. कुणबी आणि मराठा या दोन्ही वैयक्तिक संज्ञा सारख्याच गुंतागुंतीच्या आहेत.
Kunbi Caste Certificate Genealogy| कुणबी जात प्रमाणपत्र वंशावळी
जिल्हा स्तरावरती समुदायातील पात्र ऊमेदवारांसाठी महाराष्ट्र सरकारने कुणबी जात प्रमाणपत्र (Kunbi Caste Certificate) देणे सुरु केले आहे.
कुणबी जात प्रमाणपत्रकासाठी लागणारी वंशावळ कशी पहावी ?
आपल्या प्रत्येकाची वंशावळ असते. आत्ता आपल्याला प्रश्न पडेल की वंशावळ म्हणजे काय आणि ती पहावी कशी ? चला तर आपण जाणुन घेऊया वंशावळ कशी पहावी ?
- सुरुवातीला आपले स्वत:चे नांव लिहावे.
- त्यानंतर आपले वडीलांचे नांव लिहावे .
- त्यानंतर वडीलाच्या वडीलांचे म्हणजे आजोबांचे नांव लिहावे.
- त्यानंतर पंजोबा, खापरपंजोबा यांची नांवे लिहावीत .
- तहसील कार्यालयांमध्ये प्रत्येक व्यक्तीच्या जन्म-मृत्युच्या नोंदी असतात. त्या मध्ये आपल्याला कुटुंबाची संपुर्ण माहिती मिळु शकते.
- पुर्वजांचे तत्कालीन शिक्षण झालेले असेल तर त्यावेळच्या जातीच्या नोंदवहीमध्ये देखील पुर्वजांचे नांव सापडु शकते.
वंशावळीच्या प्रतिज्ञापत्रासाठी तुम्ही https://revenue.mahaonline.gov.in/Site/Common/Documents/Downloads/Application_for_Genealogical_Affidavit.pdf या लिंकवर जाऊन तुम्ही PDF स्वरुपात वंशावळ प्रतिज्ञापत्राचा अर्ज डाऊनलोड करु शकता. Kunbi Caste Certificate Genealogy
Kunabi Nondi – कुणबी नोंदी
पुणे जिल्हा कुणबी नोंदी- Pune District – Maratha Kunabi Nondi
पुणे शहर : पुणे शहर कुणबी नोंदी
खेड – : खेड कुणबी नोंदी
बारामती – Baramati – बारामती कुणबी नोंदी
पिंपरी चिंचवड – Pimpri-Chinchwad पिंपरी चिंचवड कुणबी नोंदी
हवेली – हवेली कुणबी नोंदी
अंबेगाव – अंबेगाव कुणबी नोंदी
इंदापुर – इंदापुर कुणबी नोंदी
शिरूर – शिरूर कुणबी नोंदी
मावळ – मावळ कुणबी नोंदी
जुन्नर – जुन्नर कुणबी नोंदी
भोर – भोर कुणबी नोंदी
पुरंदर तालुका : पुरंदर तालुका कुणबी नोंदी
मुळशी – मुळशी कुणबी नोंदी
दौंड – दौंड कुणबी नोंदी
वेल्हे तालुका – वेल्हे तालुका कुणबी नोंदी
कोल्हापुर जिल्हा – कोल्हापुर जिल्हा तालुका निहाय कुणबी नोंदी
पन्हाळा तालुका – पन्हाळा तालुका कुणबी नोंदी
हातकणंगले तालुका – हातकणंगले तालुका कुणबी नोंदी