दुधाची वैशिष्ट्ये |Characteristics of milk
दूध हे पूर्णांन म्हणून त्याचा स्वीकार सर्व ठिकाणी केला जातो. परंतु दुधाकडे जागतिक पातळीवरचे सर्वकंस अन्न म्हणून लोकांनी त्याकडे पहावे व त्याचे ग्रहण करावे या उदात्त हेतूने जगातील अनेक देश वर्षभरामधील एखादा दिवस राष्ट्रीय दुग्ध दिन म्हणून साजरा करतात. म्हणजे वेगवेगळ्या देशांचे दुग्ध दिन वेगवेगळ्या तारकांना ठरलेल्या आहेत. परंतु जागतिक दूध उद्योगांनी सशक्त खाद्यान्न म्हणून दुधाकडे पाहावे व त्याप्रमाणे आपली उत्पादने तयार करण्यासाठी यावर केंद्रीकरण करावे हाही हा दिन साजरा करण्याचा उद्देश आहे.
असे म्हटले जाते की दूध हे पुरणानं आहे. आपल्याकडे गायीच्या दुधाला अनन्यसाधारण महत्त्व प्रदान करण्यात आले आहे. उदाहरणार्थ पूजा उद्या पूजा विधीमध्ये दूध व दुग्धजन्य पदार्थांचा वापर त्यामुळेच केला जातो. पूर्वी गोदान हे महादान समजले जायचे. आजकाल नवीन पिढीला मात्र दुधाचे महत्त्व समजावून सांगण्याची वेळ आली आहे. वस्तूचा दूध हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनीच पिणे आवश्यक आहे. कारण त्यामुळे आपल्या शरीरास कॅल्शियम, विटामिन डी, हाडांची मजबुती, दातांची मजबुती निरनिराळ्या प्रकारची विटामिन्स.
Benifits of Milk | दुधाचे फायदे
कॅल्शियम मुळे शरीरातील हाडांचा ऱ्हास होत नाही. डोकेदुखी मुलांमधील लठ्ठपणा आणि अनावश्यक ताण कमी करण्यामध्ये कॅल्शियम कामी येते. शरीराला कॅल्शियमची कमतरता निर्माण झाल्यास अनेक गंभीर रोगांना आमंत्रण मिळते. विटामिन डी मुळे शरीरातील कॅल्शियम शरीरात राहते. यामुळे काही देशांत दुधामध्ये वरून विटामिन डी घालण्याची पद्धत आहे. असे केल्याने हाडे मजबूत होतात व लवकर तुटत नाहीत. त्याचप्रमाणे रोग प्रतिकारशक्ती वाढते. लहान मुलांनी दूध प्यायल्यास त्यांचे दात मजबूत होतात. तसेच दातांवर असलेले आवरण पण मजबूत राहते व दात लवकर खराब होत नाहीत. दूध प्यायल्यामुळे शरीरातील पाणी बाहेर पडत नाही व त्यामुळे उन्हाळ्यामध्ये बाहेर खेळत असणाऱ्या लहान मुलांना उन्हापासून संरक्षण मिळते.
दुधामध्ये विटामिन बी १, बी २, बी ३, बी ५, बी ६, बी 12 व C अशी व्हिटॅमिन्स असतात. विटामिन ए, डी, इ, के दुधातील फॅट मध्ये विरघळलेल्या स्वरूपात असतात. तसेच दुधामध्ये निरनिराळी खनिजे जशी की कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, सेलेनियम आणि झिंक असतात. ही खनिजे सर्वसाधारणपणे दुधातील प्रोटीन मध्ये विरघळलेल्या स्वरूपात असतात.
भारतात सध्या मानसी दूध उपलब्धता 345 ग्रॅम असून 2050 पर्यंत ही उपलब्धता 800 ग्राम इतकी होणार आहे. त्यामुळे भारतामध्ये दुधाची संस्कृती पुनर्जीवित करण्याची आवश्यकता आहे. सध्या चहा कॉफी, कोकाकोला अशी पेय जी शरीराला हानिकारक आहे, ती पिण्याची सवय लागल्यामुळे भारतीय नागरिकांचे शरीर प्रकृतीकडे दुर्लक्ष होत आहे.
भारतीयांच्या सवयी अशा झाल्या आहेत की त्या शरीरास पोषक नाहीत. त्यामुळे सर्व प्रकारच्या खेळात भारतीय मागे पडत आहेत. गेल्या पंधरा वर्षांपूर्वी चीनमध्ये दूध पिण्याची संस्कृती नव्हती. त्यांच्या असे लक्षात आले की त्यांच्या नागरिकांना दुधाची उपलब्धता करून दिल्यास त्यांची शारीरिक वाढ झपाट्याने होईल व त्यावर त्यांनी शाळेत सक्तीने दूध वाटपाची व्यवस्था केली आहे. त्याचा चांगला परिणाम होऊन तेथील मुले ऑलिंपिक मध्ये धावण्याच्या किंवा उंच उडीच्या शर्यतीमध्ये प्रथम येऊ लागली आहेत.
दुधामधील मॅग्नेशियम सारखी तत्वे मेंदूंच्या वाढीसाठी मदत करतात. त्यामुळे वैज्ञानिकांना असे आढळून आले की, बौद्धिक दृष्ट्या दूध पिण्याचे व्यसन हे इतरांपेक्षा जास्त बुद्ध्यांक असलेल्यांचे असू शकते. आजच्या जागतिक दुधात दुग्ध दिनानिमित्त उत्तम आरोग्य संपन्न जीवन जगण्यासाठी उत्तम गुणवत्तेचे दूध प्रत्येकाने प्यावे व शतायुषी व्हावे …