बैलगाडा शर्यत – २०२३ बंदी ते परवानगी असा झाला प्रवास…

बैलगाडा शर्यत – २०२३ बंदी ते परवानगी असा झाला प्रवास…

बैलगाडा शर्यत – २०२३

बैलाची धावण्याची क्षमता आहे किंवा नाही याबाबत यापूर्वी अनेक वेळा न्यायालयांमध्ये दोन्ही पक्षांकडून एकत्रीवाद होत असे. परंतु डिसेंबर 2017 मध्ये महाराष्ट्र शासनाने बैलांची धावण्याची क्षमता तपासण्याबाबत राज्यातील पशु तज्ञांची समिती नेमून याबाबत अभ्यास केला गेला व या समितीने प्रत्येक बैल आपल्या क्षमतेप्रमाणे धावू शकतो अशा निष्कर्षासह आपला अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केलेला आहे. बैलांच्या धावण्याच्या क्षमतेबाबत जगभरात अभ्यास गट नियमन याबाबतचा अहवाल तयार करणारे महाराष्ट्र हे देशातील नव्हे तर जगातील पहिले राज्य ठरले आहे. त्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेत या समितीचा अहवालच निर्णायक ठरला आहे.

बैलगाडा शर्यत बंदीमुळे ग्रामीण अर्थकारणाला मोठा फटका बसला होता. ग्रामदेवतेच्या यात्रेमध्ये धार्मिक व संस्कृती परंपरा म्हणून बैलगाडा शर्यती आयोजित केल्या जातात. यातून ग्रामीण अर्थव्यवस्थेत मोठी आर्थिक उलाढाल होते. शर्यत बंदीमुळे बैलांच्या संख्येत व किमतीत होणारी घट तसेच शर्यतीचे साहित्य तयार करणारे ग्रामीण कारागीर. शर्यती उपयोगी साहित्य तसेच वाहतूक व्यवस्थेसह सर्वांचेच कंबरडे मोडले होते.

शेतकऱ्यांचा बैल न्यायालयीन व क्लीन क्लिस्ट कायदे प्रक्रियेत अडकल्याने शेतकऱ्यांच्या आयुष्यातील बैल व बैलांच्या शर्यतींना असलेले सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व वादात अडकले होते. केंद्र सरकारच्या वन व पर्यावरण मंत्रालयाने जुलै 2011 मध्ये प्राणी छळ प्रतिबंधक कायदा 1960 चा आधार घेऊन अध्यादेश काढून बैलांचा समावेश राजपत्रात गॅझेट केल्यामुळे बैलांचे मनोरंजनाचे खेळ करण्यास बंदी आलेली होती. याच गॅजेटचा आधार घेऊन सर्वोच्च न्यायालयाने मे 2014 मध्ये बैलांचे प्रदर्शन व शर्यतीवर संपूर्ण देशांमध्ये बंदी घातली होती परंतु यामध्ये पशु तज्ञांचा अहवालच निर्णायक ठरल्याने आता गावोगावी बैलगाडी शर्यतींचा धुरळाच उडणार आहे.

बंदी ते परवानगी असा झाला प्रवास

*केंद्र सरकारने 2011 मध्ये ज्यांच्या प्रशिक्षणावर आणि प्रदर्शनावर बंदी आहे अशा प्राण्यांच्या यादीत बैलाचा समावेश केला.

*त्यानंतर प्राण्यांचे संरक्षण करणाऱ्या पीपल फॉर एथिकल ट्रीटमेंट ऑफ एनिमल्स पेटा या संस्थेने महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यत कर्नाटकातील कांबळा आणि तामिळनाडूतील जल्ली कट्टू खेळावर बंदी घालण्याची मागणी केली प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले.

* २०१४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने जली कट्टू वर बंदी घातली त्याचे तीव्रप्रसाद तामिळनाडूत उमटले त्यामुळे तामिळनाडू सरकारने हा खेळ सुरू ठेवण्यासाठी केंद्राकडे खास अध्यादेश लागू करण्याची मागणी केली.

* 2016 मध्ये केंद्र सरकारने अधिसूचना जारी करून काही अटीनसह जल्लीकट्टू आयोजित करण्याची परवानगी दिली.

*संपूर्ण स्पर्धेची व्हिडिओ ग्राफी करावी, बैलांची वैद्यकीय चाचणी केली जावी, डॉक्टरांचे पथक आणि उच्चपदस्थ अधिकारी स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित असावेत, अशा अटी त्यासाठी घालण्यात आल्या.

* महाराष्ट्राने प्राणी क्रुरता प्रतिबंधक कायदा 1960 मध्ये सुधारणा करून जलीकट्टू आणि बैलगाडा शर्यतींना 2021 मध्ये परवानगी दिली.

* या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात विविध प्राणी संघटनांनी आव्हान दिले.

* ८ डिसेंबर 2022 रोजी या विषयावरील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला.

* अखेर 18 मे 2023 रोजी बारा वर्षांच्या न्यायालयीन लढाईनंतर माळरानावर पुन्हा सर्जा राजाची जोडी दिमाखात दवडण्याचा मार्ग मोकळा.

शर्यतीच्या बैलांची ठेवतात शाही बडदास्त

शर्यतीच्या बैलांचा मालक, जीवापाड सांभाळ करतात. इतर बैलाप्रमाणे त्यांना शेतीच्या कामाला अजिबात जुंपले जात नाही. या बैलांना सकाळी एक डझन आणि सायंकाळी एक डझन देशी कोंबडींची अंडी पाजली जातात. शिवाय सकाळी आणि सायंकाळी एक दोन लिटर दूध पाजले जाते. रोजच्या रोज या बैलांच्या अंगाला आणि प्रामुख्याने मान, खांदे व पायाला तेल लावून मालिश केली जाते. हवामानानुसार कधी थंड तर कधी गरम पाण्याने त्यांना अंघोळ घातली जाते. शेतातील शेलका आणि हिरवागार चारा या बैलांसाठी म्हणून खास राखीव ठेवला जातो. आठवड्यातून किमान तीन-चार वेळा त्यांच्याकडून धावण्याचा सराव करून घेतला जातो. पूर्वीच्या काळी एखाद्या राजदरबारातील हत्तीची ठेवली जात नसेल एवढी या बैलांची बडदास्त त्यांच्या मालकाकडून ठेवली जाताना दिसते.

महाराष्ट्रात आनंदोत्सव

बैलगाडी शर्यत हा महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीचा भाग असून, या शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिल्याने महाराष्ट्रात आनंदात अनंतोत्सव साजरा करण्यात येत आहे. बैलगाडी शर्यत सुरू व्हावी राहावी यासाठी आम्ही केलेल्या प्रयत्नांना यश आल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, तर सुनील केदार यांनीही आपण याचा पाठपुरावा केल्याचा म्हटले आहे.

बैलगाडा घाटात भंडाऱ्याची उधळण करण्यात आली. सांगलीत जल्लोष साजरा करीत बैलगाडा मालक, शेतकऱ्यांनी गुलाल उधळून याची स्वागत केले.

विनापरवाना बैलगाडी शर्यत 22 जनावर गुन्हे…

विनापरवाना बैलगाडी शर्यतीचे आयोजन करून, लोकांच्या जीवितास धोका निर्माण करण्यासह, बैलांना मारहाण करून, छळ केल्याप्रकरणी प्रकरणी, तीन आयोजक, एक बैलजोडी व छकडा गाडी मालक आणि 18 देणगीदार अशा एकूण 22 जनावर पुन्हा दाखल झाला आहे…

Leave a Comment