Makar Sankranti Story – मकर संक्रांतीची कथा
‘मकर’ म्हणजे ‘मकर’. ‘मकर राशी’ किंवा ‘मकर राशी’मध्ये सूर्याच्या हालचालीला मकर संक्रांत म्हणतात. मकर संक्रांती चा सन प्रामुख्याने जानेवारी महिन्याच्या मध्यावरती भारतामध्ये साजरा केला जातो. भारतामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, आंध्र प्रदेश / तेलंगाना व राजस्थान ईत्यादी राज्यांमध्ये मोठ्या ऊत्साहाने साजरा केला जातो.
महाराष्ट्रामध्ये मकर संक्रांती चा सन तीन दिवस साजरा केला जातो. त्याच्यामध्ये
पहिला दिवस : Makar Sankrant – भोगी(bhogi) – ह्या दिवशी सुर्यनारायणाला प्रार्थना केली जाते.
दुसरा दिवस : Makar Sankrant – हा मकर संक्रांतीचा मुख्य दिवस म्हणुन साजरा केला जातो. ह्या दिवशी लहानांपासुन वृध्दांपर्यंत नवीन कपडे परिधान करतात व ‘ तीळगुळ घ्या गोड बोला ‘ असे म्हणत एकमेकाच्या गळाभेटी घेतात व लहान मुले ज्येष्टांच्या पाया पडतात. तीळ बाहेरून काळे आणि आतून पांढरे असतात. त्यातून आपल्याला संदेश मिळतो, ‘आतली शुद्धता राखा’. तीळ घासल्यास बाहेरूनही पांढरे होतात. या विश्वाच्या बाबतीत आपण तिळासारखे आहोत.
तिसरा दिवस – किंक्रांत – Kinkrant – हा मकर संक्रांतीचा अखेरचा दिवस असतो. याच दिवशी देवीने किंकरासुर नावाच्या राक्षसाचा वध केला.
राजस्थानमध्ये मकर संक्रांती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. गोवा मध्ये मकर संक्रांती या सनाला संक्रांती या नावाने संबोधन्यात येते. आंध्र प्रदेश आणि तेलंगाना ह्या राज्यांमध्ये मकर संक्रांती चा सन चार दिवस साजरा केला जातो. मकर संक्रांती चा सन थंडी संपत आलेली असताना व ऊन्हाळ्याच्या सुरूवातीस म्हणजेच दोन ऋतुंमध्ये साजरा केला जातो. दोन ऋतुंमध्ये होत असलेल्या बदलाला मानवी शरीराने योग्य रीतीने स्वीकारावे म्हणुन तीळगुळ, हालवा, पुरण पोळी, तांदुळाची खीर व तीळगुळाचे लाडु असे गोड पदार्थ केले जातात.
सुर्यनारायनाला वंदन व सुर्यनारायनाची पुजा हा ह्या सनाचा मुख्य हेतु असतो. ह्याच्या मध्ये सुर्यनारायन अशीच सुर्याच्या प्रकाशाची पृथ्वी वरती अशीच ऊधळन होत राहु दे अशा आसेने सुर्यनारायनास प्रार्थना केली जाते.
या सणाविषयी कथा अशी आहे की, पूर्वी शंकासुर या नांवाचा एक दैत्य होता… तो खूप उन्मत्त झाला होता, त्याचा नाश करण्यासाठी देवीने संक्रांतीचा रूप धारण केले. ही देवता साठ योजनेत पसरली असून तिचे ओठ-नाक लांबलचक व नऊ हात अशी तिची आकृती पुरुषासारखी आहे. प्रत्येक वर्षी तिचे वाहन, आयुधे बदलतात अशी कल्पना. संक्रासुर आणि नीसांसुर अशा दोन राक्षसांचा वध केला म्हणून या दिवसाला तिच्याच नांवानेओळखतात. या दिवशी सुवासिनी स्त्रिया वाण देतात व घेतात अशी पध्दत आहे…..
भिष्म उत्तरेकडील स्वर्गद्वारे उघडेपर्यंत शरपंजळ पडून राहिले व तद्नंतर देह सोडला, म्हणून या दिवशी पितर, सवाष्ण जेवायला घालतात... आर्यांनीच सूर्याच्या शक्तीमुळे विश्वातील सर्व कारभार चालू असल्याचा शोध लावलात्र. सूर्याची उपासना करून गायत्री मंत्रासारखा दिव्य मंत्र विश्वामित्राला स्वतः सूर्याने विश्वाच्या कल्याणासाठी दिला. त्यांनीही तो स्वत:जवळ न ठेवता , तमाम मानव जातीस देऊन सबंध विश्वाचे मित्रत्व व भारतीय संस्कृतीचा आदर्श ठेवला. सूर्य हा सबंध विश्वाचा खरा निरपेक्ष मित्र आहे. त्याच्या पूजेचा हा दिवस आणि याच आदर्शातून मीत्रत्वाची वाढ व्हावी, म्हणून या दिवशी मोठ्यांनी लहानांस तिळ-गूळ देऊन स्नेह व गोडवा वृध्दिंगत करावा. कोणार्क येथे फार मोठ्या रथावर बसलेल्या सूर्याचे मंदिर आहे. अरूणाचल, मेघालय अशी सूर्याच्या संबंधीची नावे भारतातील प्रदेशांनाच आहेत. या दिवशी सुवासिनी सूर्याची पूजा करून दुसऱ्या हंगामातील धान्ये, फळे (ओला हरभरा, बोर, ऊस) वगैरे लुटण्याची पध्दत देशकाल परत्वे पडली आहे. भारतभर हा सण वेगवेगळ्या नांवाने साजरा करतात. भारतीय संस्कृतीत स्त्रीया उगवत्या सूर्याच्या प्रतिकाचा रंग असलेले कुंकू माथी लावतात. त्यामुळेही हा सूर्याचा सण मानतात.....
या दिवशी सर्व श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये किंवा घरोघरी स्त्रिया हळदीकुंकू समारंभ करतात... सर्व श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रावर "सा विद्या या विमुक्तये " या आर्य संस्कृतीतील ब्रीदाचे पालन करतांना, गायत्री मंत्रापासून अनेक मंत्र, महत्वाची स्तोत्र, ग्रंथ वाचण्याची पध्दती, अनेक दुर्लभ उतारे, दृष्टी, तोडगे, अती आजारातील उपचार, वाढदिवसाची भारतीय पध्दती यांचे सुबोध संकलन असलेले नित्यसेवा नावाचे अनमोल भांडार लुटले जाते. ज्ञानदानासारखे श्रेष्ठ दान कुठलेच नाही, हे वरील विवेचनावरून सर्वांना समजावे. याशिवाय ऐपतीप्रमाणे श्रीस्वामीचरित्र, श्रीदुर्गासप्तशती, श्रीगुरूचरित्र, विवाहसंस्कार, ज्योतीषशास्त्र, जपमाळ, क्षात्रधर्म, आयुर्वेद, मराठी अस्मिता असे ग्रंथ व पुस्तक उपलब्ध आहे, याचे त्या दिवशी दान करावे. सर्व सेवाकेंद्रात प्रत्येकाने आणलेला तिळगुळाचा नैवेद्य अर्पण करून या विश्वाचे चालक, पालक, मालक श्री स्वामी समर्थांचा प्रसाद म्हणून तिळगुळ वाटतात. रथसप्तमी पर्यंत हळदी कुंकू केव्हाही करतात.....
marathi katha