का टाकणार बहिष्कार भारतीय टीम आशिया चषकावर ? |Why will the Indian team boycott the Asia Cup?
यंदाच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानला मिळाले आहे. मात्र स्पर्धेच्या आयोजनाबाबत सुरू असलेला वाद चिघळत चालला आहे. कारण भारताने सुरक्षेचे कारण देत पाकिस्तानला जाण्यास नकार दिला आहे. तरीही पाकिस्तानला ही स्पर्धा स्वतःच्या देशातच आयोजित करायची आहे. पाक ने असाच आडमुठेपणा दाखवला तर भारत या स्पर्धेवर बहिष्कारही टाकू शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
एसीसीने आशिया चषक आयोजनासाठी श्रीलंका, बांगलादेश आणि युएईला पर्याय म्हणून ठेवले होते. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचा माजी खेळाडू सन्मानभट्ट ने ही स्पर्धा इंग्लंडमध्ये खेळावी आणि त्याला युरो आशिया चषक असे नाव देण्याची अजब सूचना केली आहे. भारतीय क्रिकेट मंडळाच्या कठोर भूमिकेनंतर पाकिस्तानने या आशियाई स्पर्धेसाठी ब्रीड मॉडेल सादर केले असून, त्यानुसार पाकिस्तान आणि इतर संघांचे सामने पाकिस्तानात खेळले जातील आणि भारताचे सामने तटस्थ ठिकाणी खेळवले जातील. हा प्रस्ताव देखील भारताने फेटाळून लावला आहे.
यामध्ये इंग्लंडचा समावेश करून युरो आशिया चषक बनवू शकता. पीसीबीला त्याने सांगितले की तुम्ही हा पर्याय आशियाई क्रिकेट कौन्सिल पुढे ठेवावा. पूर्वी ऑस्ट्रेलिया आशिया चषक व्हायचा त्यात ऑस्ट्रेलिया सहभागी होत असे यामध्ये तुम्ही आयर्लंड आणि नेदरलँड चाही समावेश करू शकता. ही स्पर्धा विश्वचषकासारखी असेल कारण यात अशी यातील सहा आणि युरोपमधील चार संघ सहभागी होणार असल्याने हीच स्पर्धा दहा संघांची असेल. ही विश्वचषकाची तालीम होऊ शकते.
पाकिस्तानी मीडिया नुसार पीसीबीला हायब्रीड मॉडेलवर आशिया चषक 2023 आयोजित करण्यासाठी बांगलादेश आणि श्रीलंकेचा पाठिंबा मिळाला आहे. पीसीबी चे अध्यक्ष नजम शेती यांनी आशियाई क्रिकेट परिषदेकडे याबाबतचा प्रस्ताव सादर केला आहे. आता एसीसीचे अध्यक्ष जय शहा येत्या दोन दिवसात या प्रस्तावाचे मूल्यांकन करतील. मात्र बीसीसीआय संपूर्ण स्पर्धा दुसऱ्या ठिकाणी हलविण्यावर ठाम असल्याने भारत या स्पर्धेवर बहिष्कार टाकू शकतो.